Diet

 

Diet, Nutrition & Rest - खुराक, पोषण आणि विश्रांती 

Subscribe to our YouTube channel :

https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci-A

   

  • भरतीची प्रक्रिया सप्टेंबर /ऑक्टोबर, २०२१ अथवा त्यापुढेही चालेल.  म्हणजेच तुमच्याजवळ चांगला खुराक घेऊन  आणि व्यायाम करून करून भरतीच्या तयारीसाठी किमान  साडेतीन ते चार महिने आहेत.  या चार  महिन्यात योग्य खुराक घेतल्यास आणि मार्गदर्शनानुसार व्यायाम केल्यास तुमचे शरीर सुडौल बनेल. तसेच भर्तीसाठीच्या चाचण्या मध्ये तुम्ही सहजपणे यशस्वी होवू शकाल. खात्यातील रिक्त पदांची संख्या पाहता पुढील वर्षीही, म्हणजेच २०२२ मध्ये देखील निश्चितपणे मोठी भरती होईल.  त्यामुळे चांगला खुराक आणि भरतीच्या  तयारीसाठी मार्गदर्शनानुसार व्यायाम चालू ठेवणे हिताचे ठरेल.
  • खुराक :-
  • सकाळी चहा/कॉफी किंवा गरम पाणी + ४ ग्लुकोस अथवा तत्सम बिस्किटे  - [पहाटे ६.१५ वाजण्या पूर्वी] 
  • ६-३० ला  प्रॅक्टिस साठी  मैदानावर जावे.

  • नास्ता :-सकाळी ८-४५ त ९ -१ -आऊटडोअर प्रॅक्टिस व व्यायाम झाल्यानंतर 
  • १ / २ उकडलेली अंडी + १ किंवा २ केळी  आणि शक्य असल्यास १ ग्लास दूध 
  • दररोज आधल्या रात्री भिजवलेले अर्धा मूठ कच्चे शेंगदाणे +  थोडा गुळ
  • दररोज १ -२ वाटी कोणत्याही कडधान्याची उसळ  व उकडलेल्या पालेभाज्या. [नाश्त्यामध्ये अथवा दुपारच्या जेवणामधें]
  • पोहा/उपमा/शिरा/तेल-मीठ-भाकर/चहा-पोळी/फोडणीची पोळी/इडली-सांभार, आंबोळ्या, अथवा स्थानिक पैकी कोणतीही एक डिश
  •  [तळलेले पदार्थ खाऊ नयेत - उदा:- वडे, आलुबोन्डे ]


दुपारचे जेवण :- दुपारी १२-४५ ते १-४५ दरम्यान  [जेवणानंतर दुपारी झोपू नये.]
  • वरण-भात -भाजी-पोळी-भाकरी चे जेवण.  वरणाची पेज [२ वाट्या]     
  • आठवड्यातून ३ दिवस चिकन किंवा मटण - भाजलेले/तंदुरी अथवा  कमी तेलातील करी/बिर्याणी. जेवणाबरोबर किमान अर्धे लिंबू .
  • शाकाहारी उमेदवारांनी  चिकन/मटण ऐवजी  कोणतीही उसळ आणि सोया चंक्स चे पदार्थ  खावेत. [Search - "Soya Chunks recipes"]
  • शक्य असल्यास काकडी/टमाटर /मुळा/कांदा याचे काप  [वाटीभर] -  आणि  दही अथवा ताक [प्रोबियॉटिक असल्याने गरजेचे- शिळे अथवा फार आंबट दही टाळावे ].  
  • असल्यास sweet-dish -  [१ वाटी]

रात्रीचे जेवण :-सायंकाळी ६-४५ ते ७-४५ दरम्यान; रात्री उशिरा जेवणे टाळावे. 
  •  वरण-भात -भाजी-पोळी-भाकरी चे जेवण.
  •  रात्री तळलेले पदार्थ, नॉन-व्हेज  अथवा  sweet-dish खाऊ नये.
टीप :- वारंवार चहा-कॉफी वा कोठलेही कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक पिऊ नये. 
             त्याऐवजी केवळ साधे पाणी प्यावे. 
  • पूर्वतयारी दरम्यान कोणतेही infection होऊ नये याकरिता १५ मिनिटे उकळून गार केलेले पाणी प्यावे. 
  • फ्रिज चे थंडगार पाणी पिऊ नये.
  • Bottled /Packaged water ची कोणतीही गरज नाही.
  • Outdoor Training चा आणि एकटे असण्याचा वेळ वगळता पूर्णवेळ मास्क वापरावा. 
  • CoWin App वर रजिस्ट्रेशन करून क्रमानुसार व्हॅक्सिन घ्यावी.
  • कोरोना पासून आपला बचाव करावा.
  • कोरोनामुळे आपल्या lung-capacity वर वाईट परिणाम होऊ शकतो.
  • यामुळे यशाच्या मार्गात अडथळा येऊ शकतो.
नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी लेखी  परीक्षेचा अभ्यास रात्री करावा .  [ रात्री ७-३० ते १०-००]. यासाठी आपल्या ग्रुप मधील सहकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे वाटप करून त्याच्या नोट्स App  वर  share कराव्यात. 
रात्री १० ला  झोपावे. आऊटडोअर ची प्रॅक्टिस करीत असताना शरीरास ८ तास झोप आवश्यक असते.
******************************************************************************************************************************************************************

Copyright Notice

© 2021 Sanjay Barve E Academy
Except as otherwise noted, the content of this page is licensed under CC BY-NC-SA 4.0 license.
Suitable attribution along with the link to this website is required for use/reproduction of its content. If any additions and/or modifications are made, the same shall also be subject to, and governed by CC BY-NC-SA 4.0.